ashutoshblog.in
रम्य ही स्वर्गाहून लंका - आशुतोष ब्लॉग
सृष्टीच्या चित्रकाराने कॅनव्हासवर भरपूर रंग मोकळ्या हाताने उधळून त्यातून सुंदर चित्र निर्माण करावे, ते चित्र म्हणजे श्रीलंका.! ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते.