satyashodhak.com
हरी नरकेंचा कांगावा.. | Satyashodhak
लोकप्रभाच्या दि. ५ ऑगस्टच्या अंकात 'फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन' हा हरि नरके यांचा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की, एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी चळवळ बदनाम करण्यासाठी कोणतं तंत्र वापरावं, तर ते हरि नरके यांनी शोधलेलं आणि या लेखात वापरलेलं तंत्र होय. संपूर्ण लेखात ते पुरुषोत्तम खेडेकर, त्यांच्या मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांवर ना ना आरोपांचे लेपन करताना आढळतात. आणि हे आरोप तरी कसे, तर वस्तुस्थिती लपवून, संदर्भ सोडून आणि मजकुराच्या आशयाची नरकेंना पाहिजे तशी मोडतोड करून. 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकाविरुद्ध नोंदविलेल्या गुन्ह्याबद्दल नरके लेखात माहिती देतात. परंतु ती देताना ती स्वत:च्या अंगलट येणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. पुस्तकाविरुद्ध तक्रार करणारे शाम सातपुते हे मराठा असल्याचं आवर्जून लिहिणारे नरके, शाम सातपुते हे गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, ते भाजपचे नगरसेवकदेखील होते, इतकेच नाही; तर बदनाम भांडारकर संशोधन संस्थेच्या नियामक मंडळात हरि नरकेंच्या मांडीला मांडी लावून बसणारे तेदेखील एक