satyashodhak.com
संघाला अभिप्रेत हिंदुत्व | Satyashodhak
संघ हा मुळात चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता आहे. आर्यवंश सिद्धांत हा त्याचा पाया आहे. त्यामुळेच संघाच्या बौद्धिकात या सिद्धांताला अतिशय महत्वाचे स्थान आहे. स्वतःला आर्य म्हणविणारा हिटलर त्यामुळेच संघापुढील आदर्श आहे. संघसंस्थापक डॉ.हेडगेवार यांनी आपल्या अनुयायांमध्ये या विचाराची रोवणी केली आणि त्याला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करवून दिले,ते दुसरे संघचालक मा.स.गोळवलकर यांनी. त्यांच्या १९३९मधील 'वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइंड ' या पुस्तकात ते म्हणतात (७): " हिटलरने लाखो ज्यू लोकांची जी कत्तल केली,ती योग्य होती. आम्हीही तोच कित्ता गिरवू. ... जर्मनीने सिद्ध केले की,भिन्न वंश व संस्कृतीचे लोक एकत्र नांदूच शकत नाहीत. त्यांचे एकजीवत्व अशक्य आहे आणि हिंदुस्थानने जर्मनीपासून हा धडा घेतलाच पाहिजे. तसेच हिंदू उदार आहेत. हिंदुस्थानात गैरहिंदूंना राहण्याची मंजुरी दिली जाईल. पण या अटीवर की त्यांनी हिंदुत्वासमक्ष समर्पण करावं. हिंदुत्वाचे गुणगान करण्याशिवाय त्यांनी काहीही करू नये. त्यांची आपली स्वतंत्र ओळख नसावी. त्यांनी स्वतःसाठी विशेषाधिकार मागू नये.नागरिक हक्क सुद्धा मागू नये. तेव्हाच