satyashodhak.com
श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले | Satyashodhak
'मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.' श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत नाही. अगदी सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणार्‍या सातार्‍यातल्या पत्रकारांचीही नाही! सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम 'ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स'! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी क्षणाक्षणाला जाणवते. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात. लोक त्यांना थोडे घाबरूनच असतात. थोडं अंतरही ठेवतात. पण मध्येच अचानक उदयनराजेंचा मूड बदलतो आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडतात. लोकांना धक्का द्यायला उदयनराजेंना खूप आवडतं. उदयनराजेंबद्दल सातार्‍यातच नव्हे तर राज्यभर अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. सातार्‍यातील पत्रकारांमध्ये तर या आख्यायिका मोठया चवीने चघळल्या जातात. पत्रकार परिषद असो वा राजकीय मेळावा; उदयनराजे नेहमीच