satyashodhak.com
शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे | Satyashodhak
अखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर धरून उभा असलेला त्याचा आजा पणजा त्याला खास दिसल्याशिवाय रहाणार नाही. शेतकऱ्यांचे स्वराज्य या प्रबोधनकार ठाकरेंच्या ग्रंथातील हा उतारा शेतकरी संपाच्या विरोधात ओरड करणाऱ्या शहरीजनांना आजही मोठ्या प्रमाणात लागू होतो. संपूर्ण पुस्तक खालील लिंकवरून मिळवा. पुस्तक इथे वाचा : शेतकऱ्यांचे स्वराज्य PDF Ebook