satyashodhak.com
मराठा नेते कोठे आहेत? | Satyashodhak
ऊस व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण सध्या बातम्या पाहत आणि वाचत आहात. महाराष्ट्रभर शेतकर्‍यांच्या घराघरात, ओटयावर, गल्लीत, गावात या उपोषण, आंदोलने करणार्‍या नेत्यांवर चर्चा होत आहे. हे नेते शेतकर्‍यांना आपल्या जवळचे वाटत आहेत. खा. राजू शेट्टी यांनी तर उसाच्या भाववाढीसंदर्भात बारामती येथे आमरण उपोषण करून उसाला भाव मिळवून दिला व मगच उपोषण सोडले. वरील सर्व आंदोलन करणार्‍या नेत्यांवर नजर फिरवली तर आपल्या असे लक्षात येते की, यामध्ये एकही मराठा नेता नाही. अगदी जातीसहीतच सांगायचे झाले तर ऊसप्रश्नावर आंदोलन कराणारे नेते खा. राजू शेट्टी (जैन), कापूस प्रश्नावर आंदोलन करणारे आ. रवी राणा (राजपुत), आ. गिरीष महाजन (गुजर), कापूस प्रश्न संसदेत घेऊन जाणारे खा. गोपीनाथराव मुंडे (वंजारी), खा. चंद्रकांत खैरे (बुरूड), कापूसदिंडी काढणारे दिवाकर रावते (माळी), आ. पाशा पटेल (मुसलमान), विजेच्या प्रश्नावर मोर्चा काढणारे आ. प्रशांत बंब (मारवाडी) आहेत. या सर्व नेत्यांच्या जाती दाखवून मला जातीवाद करायचा नाही, पण एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो, या यादीत एखाद्या तरी मराठा नेत्याचे नाव