satyashodhak.com
अखेर दादू हटवलाच! | Satyashodhak
ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो! दादोजी कोंडदेव ठेचला हो!! दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार! आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक लागला होता तो दादोजी हटल्याने पुसून निघाला आहे. दादोजी हे शिवरायांचे गुरु होते हे ब्राम्हण इतिहासकारांनी आतापर्यंत आमच्या डोक्यात ठसवले होते. आणि त्याला कुठलाही पुरावा नव्हता. पण जेम्स लेनने दादोजी गुरु करण्यामागची जी विकृत मानसिकता होती ती उघडकीस आणली आणि आम्ही जेंव्हा स्वतः इतिहास तपासला तेंव्हा दादोजी गुरु नसल्याचे उघड झाले. मग आतापर्यंत ह्या तथाकथित इतिहासकारांनी आमच्यावर चुकीचा इतिहास का थोपला? ह्याला एकच उत्तर आहे वर्चस्ववाद! जगात जे काही चांगले असेल ते आमचे, आणि वाईट असेल ते दुसर्‍यांचे हि अवसानघातकी प्रवृत्ती! तुम्ही कितीही मोठे झालात तरी ब्राम्हण गुरु असल्याशिवाय तुम्ही तसे घडूच शकला नसता हा