ashutoshblog.in
एमएमएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी
भारत माता की जय म्हणू न शकणाऱ्या एमआयएम चा इतिहास,१९५७ साली कासीम रझवी ह्याला तत्काळ पाकिस्तानात निघून जाण्याच्या अटीवर कैदेतून सोडण्यात आले. पण बाहेर येताच त्याने तत्काळ मजलिस प्रमुख सदस्यांची बैठक बोलावली. त्यात १४० पैकी केवळ ४० सदस्य उपस्थित होते. कासीम रझवी ने ह्या बैठकीत इतरांपुढे अध्यक्ष होऊन संघटना पुढे नेण्याचा पर्याय ठेवला, पण कुणीही पुढे आले नाही तेव्हा सर्वानुमते रझवीच्या मर्जीतील अब्दुल वाहेद ओवेसी यांना मजलिसचे अध्यक्षपद दिले गेले, अन अशा प्रकारे ओवेसी घराण्याकडे रझवीचा वारसा चालत आला.