mazespandan.com
Fathers Day Special - बाप... - स्पंदन
बायको “गोड बातमी” सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते तेव्हा पुरुषाचा बाप होतो… नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो…. बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात, तेव्हा पुरुषाचा बाप होतो… मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागते, तेव्हा पुरुषाचा बाप होतो… “लाईन …